Diabetes : डायबिटीजमध्ये औषधासारखं काम करतं 'हे' १ फळ, रोज खाल्ल्याने शुगर राहील कंट्रोलमध्ये

Shreya Maskar

मधुमेह

मधुमेही रुग्णांसाठी फळे फायदेशीर असतात. मात्र फळे नेहमी ताजी, संपूर्ण आणि नैसर्गिक स्वरूपात खावीत. ज्यूस किंवा फळांचा रस काढून पिणे टाळावे, कारण त्यामुळे फायबर नष्ट होते आणि रक्तातील साखर वेगाने वाढते.

Diabetes | pinterest

बेरी

मधुमेहींसाठी स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रास्पबेरी यांसारखी फळे सर्वोत्तम पर्यायांपैकी आहेत. त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. यात अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यास प्रतिबंध करते.

Berries | pinterest

सफरचंद

सफरचंद हे फायबरने समृद्ध असते. सफरचंद सालीसकट खावेत, कारण त्यातील बहुतेक फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स सालीमध्ये आढळतात. दररोज एक सफरचंद खाल्यास टाईप २ मधुमेहाचा धोका कमी होतो.

Apples | pinterest

नाशपाती

नाशपातीमध्ये आपल्या दैनंदिन गरजेच्या सुमारे एक चतुर्थांश फायबर असते. हे फळ शरीरातील साखरेचे शोषण मंद करून रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी ओळखले जाते.

Pears | pinterest

संत्रे

संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असते आणि त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. त्यामुळे मर्यादित प्रमाणात संत्री खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढत नाही. रसाऐवजी संत्री अख्खी खाणे अधिक फायदेशीर मानले जाते.

Oranges | pinterest

द्राक्षे

द्राक्षांमध्ये पोटॅशियम लक्षणीय प्रमाणात असते, जे शरीरातील सोडियमची पातळी संतुलित करून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, द्राक्षांमधील अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

Grapes | pinterest

चेरी

चेरी फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो आणि ते फायबर, अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असते. चेरी रक्तातील साखरेची पातळी आणि दाह कमी करतात.

Cherries | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : डायबिटीजच्या आधी दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच लक्ष दिलं तर टाळता येऊ शकतो मोठा धोका

Diabetes | AI PHOTO
येथे क्लिक करा...