Shruti Vilas Kadam
रताळ्यामध्ये कर्बोदके असतात. त्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. हिवाळ्यात थकवा जाणवत असेल, तर आहारात रताळ्याचा समावेश करू शकता. उकडलेले रताळे खाणे हा चांगला पर्याय आहे.
रताळ्यामध्ये फायबर असते. त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते. तसेच पोट साफ होण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊ शकतो.
रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते. हे घटक शरीराला निरोगी ठेवण्यास आणि आजारांशी लढण्याची ताकद वाढवण्यास मदत करतात.
रताळ्यामध्ये बीटा-कॅरोटीन असते. शरीराला त्यापासून व्हिटॅमिन ए मिळते. हे जीवनसत्त्व डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करते. त्यामुळे रताळे खाणे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते.
रताळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. तसेच त्वचेसाठी आवश्यक असलेले कोलेजन तयार होण्यासही मदत मिळते.
रताळ्यामध्ये पोटॅशियम असते. यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. तसेच रताळ्यातील फायबर हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.
रताळ्यामध्ये फायबर असल्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही. वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर उकडलेले रताळे आहारात घेऊ शकता. मात्र, ते योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.