ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पाणीपुरी मर्यादित प्रमाणात खाल्ली गेली आणि स्वच्छतेची देखील काळजी घेतली गेली, तर पाणीपुरी खाणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
पाणीपुरीचे पाणी हिंग, पुदिना आणि जीरे यांच्या मिश्रणापासून बनवले जाते. या सर्व गोष्टी गॅस आणि अॅसिडिटीच्या समस्यांमध्ये आणि पचनासाठी खूप चांगल्या आहेत.
तिखट चवीमुळे मूडही लगेच सुधारतो. पाणीपुरी खाल्ल्याने डोपामाइन हार्मोन बाहेर पडतो, ज्यामुळे तुम्हाला चांगले वाटते.
पाणीपुरीच्या पाण्यात धणे, जीरे, पुदिना, कैरी आणि हिंग सारख्या गोष्टी असतात. जे पोटाचे आरोग्य राखते. पाणीपुरी मर्यादित प्रमाणात खाल्ले तर वजन देखील कमी होऊ शकते.
पाणीपुरीच्या पाण्यात पुदिना आणि चिंच मुबलक प्रमाणात असते. जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास देखील मदत करते.
ज्यांना भूक लागत नाही त्यांच्यासाठीही पाणीपुरी फायदेशीर आहेत. त्यामध्ये असलेले मसाले भूक वाढवण्यास मदत करते.
पाणीपुरीच्या पाण्यात हिंग, जिरे, पुदिना, आलं असे अनेक मसाले आणि औषधी वनस्पती असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात.