ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रात्री जेवण केल्यानंतर बऱ्याच वेळा छातीत जळजळ होऊ शकते. याची काही प्रमुख कारणे असू शकतात, जाणून घ्या.
जर तुम्हाला रात्री उशिरा जेवण्याची सवय असेल तर त्यामुळे छातीत जळजळ होऊ शकते.
बरेच लोक जेवल्यानंतर लगेच झोपतात. ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही आणि छातीत जळजळ होऊ शकते.
जर तुम्हाला जास्त चहा आणि कॉफी पिण्याची सवय असेल तर यामुळे छातीत जळजळ होण्याची शक्यता वाढते.
अनेक लोकांच्या पोटात अन्न पचवताना जास्त प्रमाणात अॅसिड तयार होते, ज्यामुळे छातीत जळजळ होऊ शकते.
जर तुमचे वजन झपाट्याने वाढले असेल, तर यामुळे तुम्हाला खाल्ल्यानंतर छातीत जळजळ होऊ शकते.
जर तुम्हाला वारंवार छातीमध्ये जळजळ होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.