ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दररोज रिकाम्या पोटी पेरूची पाने खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
पेरूच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे अनेक आजारांना रोखण्यास मदत करतात.
पेरूची पाने दररोज खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
पेरूची पाने बद्धकोष्ठता, अपचन आणि अॅसिडिटी यासारख्या पोटाच्या समस्या कमी करण्यास मदत करतात.
पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटक असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
पेरूची पाने चावल्याने तोंडाची दुर्गंधी, हिरड्या सुजणे आणि दातदुखी यापासून आराम मिळतो.
पेरूची पाने कोलेस्ट्रोरॉल आणि रक्तदाब नियंत्रित करतात. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.