ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मूगाच्या डाळीचा चिला हा एक हेल्दी आणि टेस्टी पदार्थ आहे. घरी हा पदार्थ बनवण्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा.
भिजवलेले मूग, कांदा, हळद, टोमॅटो, लाल तिखट, हिरवी मिरची, मीठ, आणि तूप किंवा तेल
मूगाच्या डाळीचा चिला बनवण्यासाठी आदल्या रात्री मूग भिजत ठेवा.
भिजवलेले मूग मिक्समध्ये वाटून घ्या. यामध्ये हळद, मीठ आणि लाल तिखट घालून बॅटर व्यवस्थित मिक्स करुन घ्या.
एका पॅनवर तेल किंवा तूप घालून चिलाचा बॅटर घालून व्यवस्थित डोसाप्रमाणे पसरवा.
यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून चिला दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.
हेल्दी आणि टेस्टी मूगाच्या डाळीचा चिला तयार आहे. दही किंवा पुदीनाच्या चटणीसोबत आस्वाद घ्या.