ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पेरुमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स असतात.यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असतात.
पेरुमध्ये फायबर असल्याने पचनक्रिया सुधारते. आणि अपचन सारखी समस्या दूर होऊन पचनक्रिया चांगली होते.
पेरुमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.
पेरु खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. जे मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.
पेरुमध्ये व्हिटॅमिन सीमुळे कोलेजनचे उत्पादन वाढवते ज्यामुळे त्वचा हेल्दी आणि चमकदार होते.
पेरुमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि कॅलरीज कमी असतात त्यामुळे याता डाएटमध्ये समावेश केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
पेरुमध्ये पोटॅशियम असते. जे रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात. आणि हृदयाच्या विकाराचा धोका कमी होतो.
पेरु व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
NEXT: मिठाच्या अतिसेवनाने आरोग्यावर होतील 'हे' गंभीर दुष्परिणाम