Surabhi Jayashree Jagdish
लसणामध्ये अॅलिसिन नावाचं कंपाऊंड आढळतं. त्यात अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. त्यामुळे नियमित सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होऊ शकते.
कच्चा लसूण रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. तो खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठीही उपयुक्त मानला जातो. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होऊ शकतो.
लसूण पचनासाठी आवश्यक एन्झाइम्सना एक्टिव्ह करण्याचं काम करतं. त्यामुळे अन्नाचं पचन चांगल्या प्रकारे होतं. तसंच आतड्यांचं आरोग्य सुधारण्यासही त्याची मदत होते.
लसणात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक त्वचेचं नुकसान करणाऱ्या फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. त्यामुळे पिंपल्स कमी होण्यास आणि त्वचा ग्लो होण्यास मदत मिळू शकते.
लसूण यकृताचं कार्य अधिक प्रभावी बनवण्यास मदत करतं. त्यामुळे शरीरातील टॉक्सिन घटक बाहेर टाकण्याची प्रक्रिया सुधारू शकते. यामुळे शरीर आतून स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत मिळते.
जास्त प्रमाणात लसूण खाल्ल्यास काही लोकांना पोटदुखी किंवा अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. तसंच काही प्रकरणांमध्ये रक्त पातळ होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नियमित सेवन सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.