ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
डार्क चॉकलेटमध्ये साखरेचे प्रमाण कमी असून अधिक प्रमाणात कोकोआ आढळतो. तसेच यामध्ये फायबर, आयरन आणि अँटी ऑक्सिडंट्स देखील असतात.
काही डार्क चॉकलेटमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. परंतु मिल्क चॉकलेट आणि अन्य गोड पदार्थांच्या तुलनेत डार्क चॉकलेटमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते.
तज्ञ्जांच्या मते, डार्क चॉकलेट खाल्ल्याने रक्तातील साखरेचे पातळी वाढत नाही. परंतु, अतिप्रमाणात चॉकलेट खाल्ल्याने परिणाम होऊ शकतो.
मधुमेही रुग्ण डार्क चॉकलेट खाऊ शकतात. परंतु त्यांनी ८५ टक्केपेक्षा जास्त कोको आणि नो अॅडेड शुगर असणारी डार्क चॉकलेट खावी.
मधुमेही रुग्ण एका दिवसात एक ते दोन तुकडे म्हणजेच १० ते २० ग्रॅमपर्यंत डार्क चॉकलेट खाऊ शकतात.
डार्क चॉकलेट खाल्ल्याने ताण कमी होऊन मूड सुधारतो. तसेच ब्लड प्रेशर देखील नियंत्रणात राहते.
मायग्रेन आणि किडनी स्टोनचा त्रास असलेल्या रुग्णांनी डार्क चॉकलेट खाऊ नये.