ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुलतानी माती हे एक नैसर्गिक उपाय असून वर्षानुवर्षेपासून त्वचेची काळजी घेण्याकरीता मुलतानी मातीचा उपयोग केला जातो.
मुलतानी माती हे त्वचेतील अतिरिक्त तेल आणि घाण शोषून घेण्यास मदत करते, ज्यामुळे चेहरा स्वच्छ आणि ताजा दिसतो.
मुलतानी माती काहींच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरु शकते. तर काहींची त्वचा मुलतानी मातीच्या वापरामुळे ड्राय होऊ शकते.
मुलतानी माती वापरल्यामुळे त्वचेवर जळजळ जाणवू शकते. तसेच रॅशेज सुद्धा होऊ शकतात.
मुलतानी माती वापरताना खाज सुटणे किंवा पुरळ उठल्यास हे ताबडतोब वापरणे थांबवा.
मुलतानी मातीच्या चुकीच्या वापरामुळे त्वचेचा रंग असमान होऊ शकतो. आणि त्वचेवर डाग येऊ शकतात.
जर त्वचेवर कट किंवा जखम असेल तर मुलतानी माती लावणे टाळा, त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतो.