ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात व्हिटॅमिन सीयुक्त संत्री, लिंबू आण आवळा अशी फळे खा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
आहारात पालक, मेथी सारख्या पालेभाज्यांचा समावेश करा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
पावसाळ्यात रोगप्रतिकाशक्ती वाढवण्यासाठी आलं आणि हळदीचा चहा प्या. यामुळे सर्दी , खोकल्या आजारापासून बचाव होतो.
पावसाळ्यात आहारात लसणाचा समावेश करा. यामध्ये अँटी व्हायरल गुणधर्म असतात. जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
दही आणि ताकामध्ये प्रोबायोटिक असतात. जे पचनसंस्था आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे.
रोजच्या आहारात बदाम, अक्रोड आणि फ्लॅक्ससीड्स सारख्या बियांचा समावेश करा.
पावसाळ्यात डिहायड्रेशपासून बचाव करण्यासाठी शरीराला आवश्यक पुरेसे पाणी प्या.