ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मधुमेह एक असा आजार आहे. जो फक्त योग्य आहार आणि औषधांनीच नियंत्रित केला जाऊ शकतो.
नाचणीमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फॅट, व्हिटॅमिन, कॅल्शियम, पोटॅशियम, फायबर आआणि आयरनसारखे पोषक घटक असतात.
मधुमेही रुग्णांनी नाचणीची भाकरी खावी कारण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. याशिवाय त्यात फायबर देखील असते.
जर तुम्हाला हाडांशी संबधित काही आजार असतील तर आहारात नाचणीच्या भाकरीचा समावेश करा.
नाचणीमध्ये पोटॅशियम असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
नाचणी हे आयरनने समृद्ध आहे. जर शरीरात रक्ताची कमतरता असेल तर आहारात नाचणीच्या भाकरीचा समावेश करा.
स्नायूंना बळकट करण्यासाठी नाचणीची भाकरी खा. यामध्ये असलेले प्रोटीन स्नायूंना बळकट करण्यासाठी मदत करतात.