ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाणं हे फक्त मोठ्यांसाठीच नव्हे तर लहान मुलांच्या आरोग्यासाठीही तितकेच हानिकारक आहे.
मुलांना जास्त प्रमाणात गोड पदार्थ दिल्यास त्यांच्या दातांमध्ये कॅव्हिटी होऊ शकते. याशिवाय दातांमध्ये किड लागू शकते.
गोड पदार्थांमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त आहे. यामुळे थकवा आणि आळशीपणा येतो. याचा परिणाम म्हणजे वजन वाढू लागते.
जास्त गोड खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल लगेच वाढतो आणि कमी होतो. यामुळे मुलांमध्ये राग येणे चिडचिड करणे या गोष्टी वाढतात.
जास्त गोड खाणारे मुलं बाकीच्या मुलांसारखे अॅक्टिव्ह राहत नाही ते लगेच थकतात. आणि आळशी होतात.
अतिप्रमाणात गोड खाणाऱ्या मुलांना झोपेची समस्या निर्माण होते. यामुळे ते आणखी चिडचिड करतात.
गोड खाल्ल्याने लहान मुलांचे पोट लगेत भरते परंतु यामध्ये व्हिटॅमिन, आयरन आणि प्रोटीनची कमतरता असल्यामुळे मुलांना पोषण मिळत नाही.