ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात अनेक जण दही आणि काकडीचा रायता खातात. परंतु दही आणि काकडी एकत्र खावी का, जाणून घ्या.
दही आणि काकडी दोघांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी आणि पोषक तत्व असतात.
दहीमध्ये प्रोबायोटिकसह अनके पोषक तत्व असतात. दही काकडीसोबत खाल्ल्याने शरीर थंड राहते.
दही आणि काकडीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते. या दोघांचे मिश्रण पचनासाठी फायदेशीर मानले जाते.
जर तुम्हाला दही आणि काकडी एकत्र खायची असेल तर ती योग्य वेळी खाणे महत्वाचे आहे.
काकडी आणि दही एकत्र खाण्याची योग्य वेळ दुपारी आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते.
जर तुम्ही रात्रीच्या जेवणात दही आणि काकडीचे सेवन करत असाल तर ते मर्यादित प्रमाणात खा.