Manasvi Choudhary
ड्रायफ्रुट्स खायला अनेकांना आवडतात. त्यात काजू अनेकांच्या आवडीचे ड्रायफ्रुट आहे.
काजूमध्ये प्रोटिन, हेल्दी फॅट्स, फायबर, व्हिटॅमिन्स आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.
जर तुम्ही सलग १ महिना दररोज काजू खाल्लात तर आरोग्यामध्ये अनेक सकारात्मक बदल होतात
काजूमध्ये हेल्दी फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीराला ऊर्जा देतात. जर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल, तर रोज खा. काजू खाल्ल्याने मूड फ्रेश राहतो शरीरात एनर्जी येते.
काजूमध्ये मॅग्नेशियम, तांबे आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. जे हाडांची घनता वाढवण्यासाठी आणि सांधेदुखीचा त्रास कमी करतात.
काजूमध्ये मोनोअनस्याचुरेटेड फॅट्स असतात, जे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवतात यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
काजूमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स आणि त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहेत. काजू खाल्ल्याने केस काळे होतात.
काजूमध्ये झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून संसर्गाविरुद्ध लढण्यास मदत करतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या. Milk Or Paneer: दूध आणि पनीर खरे आहे की बनावट? घरीच ओळखा या 4 सोप्या टिप्सने
https://saamtv.esakal.com/ampstories/web-stories/real-vs-fake-milk-and-paneer-4-easy-home-tests-to-check-purity-quality-and-detect-adulterated-dairy-products-msc01