Dhanshri Shintre
सफरचंदाच्या बियांमध्ये अॅमिग्डॅलिन नावाचे संयुग असते, जे पचनक्रियेनंतर सायनायडमध्ये रूपांतरित होते.
अपघाताने १-२ बिया खाल्ल्यास मोठे नुकसान होत नाही, पण अधिक बिया खाल्ल्यास धोका वाढतो.
मोठ्या प्रमाणात बिया खाल्ल्यास डोके दुखणे, उलट्या, चक्कर येणे, श्वसनास त्रास होतो.
लहान मुलांनी सफरचंदाच्या बिया खाल्ल्यास विषबाधेचा धोका अधिक असतो.
गर्भावस्थेत या बिया खाल्ल्यास अपाय होण्याची शक्यता असते.
सायनायडमुळे पचनक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो आणि पोटदुखी, जळजळ होऊ शकते.
विषारी प्रभावामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, हृदयाचे ठोके मंद होऊ शकतात.
अत्यंत जास्त प्रमाणात सायनायड शरीरात गेल्यास मृत्यू होऊ शकतो, पण हे फारच दुर्मिळ आहे.
सफरचंद खाण्यापूर्वी बिया काढून टाका आणि लहान मुलांना फळाच्या बिया देऊ नका.