Manasvi Choudhary
उन्हाळ्यात कलिंगड हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. शरीर हायड्रेट राहण्यासाठी कलिंगड खाल्ले जाते.
कलिंगड खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघण्यास मदत होते.
कलिंगडमध्ये फायबर असल्याने पचनक्रिया देखील सुधारण्यास मदत होते.
सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने शरीरातील टाकाऊ आणि विषारी पदार्थ बाहेर पडतात.
कलिंगडमध्ये कॅलरीज प्रमाण कमी असते यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते, भूक लागत नाही यामुळे वजन कमी होण्यासाठी कलिंगड फायदेशीर आहे.
कलिंगड खाल्ल्यानंतर किमान ४५ मिनिटे ते १ तास पाणी पिणे पूर्णपणे टाळावे. कलिंगडमध्ये आधीच पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते; त्यावर लगेच पाणी पिल्याने पचनक्रिया बिघडू शकते
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.