Soaked raisins: सकाळी उपाशी पोटी खा रात्रभर भिजवलेले मनुके; मिळतील हे चमत्कारीक फायदे

Surabhi Jayashree Jagdish

पचनक्रिया सुधारण्यास मदत

रात्री भिजवलेले मनुके मऊ झाल्यामुळे ते पचायला तुलनेने सोपे होतात. त्यामधील फायबरमुळे शौचास साफ होण्यास मदत मिळू शकते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्यास मदत लागू शकतो.

Raisins benefits | saam tv

लोहाची कमतरता

मनुक्यांमध्ये लोह (Iron) आणि काही प्रमाणात बी-समूहातील जीवनसत्त्वं आढळतात. त्यामुळे लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होऊ शकते. ज्यांना लोहाची कमतरता किंवा अॅनिमियाचा धोका आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार संतुलित आहारात मनुक्यांचा समावेश करू शकतात.

Empty stomach benefits | saam tv

शरीराला ऊर्जा मिळते

मनुक्यांमध्ये नैसर्गिक साखर असल्यामुळे सकाळी शरीराला जलद ऊर्जा मिळण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी अशक्तपणा किंवा थकवा जाणवत असल्यास काही लोकांना ताजेतवानं वाटू शकतं. नियमित व्यायाम करणाऱ्यांसाठीही हा नैसर्गिक ऊर्जेचा चांगला स्रोत ठरू शकतो.

Morning health routine | saam tv

रक्तदाब

मनुक्यांमध्ये पोटॅशियमचं प्रमाण चांगलं असतं. पोटॅशियम शरीरातील सोडियमचा परिणाम संतुलित ठेवण्यास मदत करतं ज्याचा रक्तदाबावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. मात्र उच्च रक्तदाबाच्या उपचारांसाठी औषधांचा पर्याय म्हणून मनुके वापरू नयेत.

Digestive health | saam tv

पोषक घटक

सुमारे 10 ते 15 मनुक्यांमध्ये अंदाजे 60 कॅलरी, 16 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 1 ग्रॅम फायबर, 0.35 मिग्रॅ लोह आणि 150 मिग्रॅ पोटॅशियम असतं. हे पोषक घटक शरीराच्या दैनंदिन कार्यांसाठी उपयुक्त ठरतात.

Healthy breakfast tips | saam tv

मनुके खाण्याची योग्य पद्धत

रात्री 8 ते 10 स्वच्छ मनुके एका कप स्वच्छ पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर ते मनुके नीट चावून खावेत जेणेकरून त्यातील पोषक घटकांचं शोषण चांगलं होईल.

Dry fruits benefits | saam tv

या गोष्टी लक्षात ठेवा

मनुक्यांमध्ये नैसर्गिक साखर असल्याने मधुमेह असलेल्या व्यक्तींनी त्यांचं प्रमाण डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ठरवावं. दररोज मर्यादित प्रमाणात म्हणजे साधारण 8 ते 10 मनुके खाणं पुरेसं मानलं जातं.

Soaked dry fruits | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Weight management diet | saam tv

Milk: दूध प्यायल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का?

Healthy lifestyle | saam tv
येथे क्लिक करा