Foods for acidity: दररोज फक्त 1 चमचा खा या 5 गोष्टी; एसिडीटी आण पाईल्सपासून मिळेल झटक्यात आराम

Surabhi Jayashree Jagdish

भिजवलेलं प्लम

रात्री ४ ते ५ प्लम पाण्यात भिजत ठेवून सकाळी खाल्ल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्येत मदत होऊ शकते. आलुबुखाऱ्यामध्ये नैसर्गिक लॅक्सेटिव्ह गुणधर्म असतात, ज्यामुळे आतड्यांची हालचाल सुलभ होण्यास मदत होते.

Foods for acidity | saam tv

अळशीच्या बिया

दररोज एक चमचा अळशीच्या बिया आहारात घेतल्याने हार्ट हेल्थसाठी फायदा होऊ शकतो. यामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे मानले जातात. यामुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.

Foods for gas | saam tv

बडीशेप

जेवणानंतर एक चमचा बडीशेप खाल्ली जाते. बडीशेप घेतल्याने अॅसिडिटी, गॅस आणि पोट फुगण्यासारख्या समस्यांमध्ये आराम मिळण्यास मदत होऊ शकते. तसंच ती पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास आणि पोटाला थंडावा देण्यास मदत करते.

Foods for bloating | saam tv

किमची

दररोज एक चमचा किमची आहारात समाविष्ट केल्याने गट हेल्थसाठी फायदा होऊ शकतो. किमची हा फर्मेंटेड पदार्थ असून त्यामध्ये प्रोबायोटिक्स म्हणजेच चांगले बॅक्टेरिया आढळतात. हे चांगले बॅक्टेरिया पचनक्रिया सुधारण्यास आणि आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात.

Gut health foods | saam tv

कलौंजी

दररोज एक चमचा कलौंजी खाण्याचाही आहारात समावेश करता येतो. कलौंजीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे शरीरातील सूज कमी करण्यास मदत होऊ शकते.

Prunes for constipation | saam tv

आहारात कसा समावेश कराल?

ही पाचही पदार्थ रोजच्या आहारात सहजपणे समाविष्ट करता येऊ शकतात. मात्र त्यांचं सेवन योग्य प्रमाणात करणं महत्त्वाचं आहे. प्लम रात्री पाण्यात भिजवून खाता येतात तर अळशी आणि कलौंजीचे प्रमाण एक चमचा ठेवता येते.

Flaxseeds health benefits | saam tv

पचनासोबत एकूण आरोग्यासाठीही उपयोगी

बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, गॅस आणि ब्लोटिंग यांसारख्या पचनाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारातील योग्य पदार्थांची निवड महत्त्वाची ठरते. अळशी आणि किमचीसारख्या पदार्थांचा हार्ट व गट हेल्थशीही संबंध जोडला जातो, तर बडीशेप पचनासाठी आणि कलौंजी सूज कमी करण्यासाठी आहारात घेतली जाते.

Fennel for acidity | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Kimchi probiotics | saam tv

Castor oil belly button: रात्री झोपताना नाभीमध्ये लावा एरंडेल तेल; हे 7 चमत्कारिक फायदे मिळतील

Castor oil belly button | saam tv
येथे क्लिक करा