Dhanshri Shintre
जवस आरोग्यासाठी लाभदायक असल्याने, बडीशेपप्रमाणे जेवणानंतर त्याचे सेवन केले जाते.
जवस प्रोटीन, मॅग्नीशियम, फॉस्फोरस, कॉपर, फायबर, ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे.
रात्रभर भिजवलेले जवस सकाळी खाल्ल्यास शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
भिजवलेल्या जवसामध्ये भरपूर फायबर असते, जे पचनतंत्र सुधारते आणि गॅसच्या समस्येपासून मुक्तता मिळवण्यास मदत करते.
जवस फायबर आणि हेल्दी फॅटने समृद्ध असल्याने दीर्घकाळ तृप्तीची भावना देते आणि वजन कमी करण्यास मदत करते.
जवसातील ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
जवस डायबिटीज रुग्णांसाठी उपयुक्त आहे, कारण ते ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
रात्रभर भिजवलेले एक ते दोन चमचे जवस सकाळी रिकाम्या पोटी किंवा दह्यासोबत खाल्ले तरी फायदेशीर ठरते.