Fruits for Health: या ३ फळांमध्ये लपलेलं आहे निरोगी आयुष्याचे गुपित; आजच तुमच्या डाएटमध्ये करा समावेश

Shruti Vilas Kadam

ब्लूबेरी खाण्याचे फायदे

ब्लूबेरीमध्ये अँथोसायनिन्स आणि इतर अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीरातील पेशींचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान कमी करण्यास मदत करतात. ब्लूबेरीमधील पोषक घटक हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त ठरू शकतात.

Blueberry | pinterest

सफरचंद खाण्याचे फायदे

सफरचंदामध्ये फायबर आणि पेक्टिन असते. हे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते. सफरचंदाच्या सालीमध्येही फायदेशीर वनस्पतीजन्य घटक असतात.

Daily apple consumption | saam tv

संत्री खाण्याचे फायदे

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि पोटॅशियम असते. व्हिटॅमिन सी शरीराच्या रोगप्रतिकारकशक्ती वाढवते. पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे.

Which state is the largest producer of oranges in India?

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

सफरचंद, ब्लूबेरी आणि संत्री या फळांमधील फायबर, जीवनसत्त्वे आणि वनस्पतीजन्य घटक हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

Blueberries | pinterest

पचनक्रिया सुधारण्यास मदत

सफरचंद आणि संत्र्यामध्ये फायबर असते. फायबरमुळे आतड्यांचे आरोग्य चांगले होण्यास आणि मलविसर्जन नियमित होण्यास मदत होते.

Two apples a day | saam tv

शरीराला मिळतात आवश्यक पोषक घटक

या तीन फळांमधून शरीराला वेगवेगळी पोषकतत्त्वे मिळतात. सफरचंदातून फायबर, ब्लूबेरीमधून अँटीऑक्सिडंट्स आणि संत्र्यामधून व्हिटॅमिन सी मिळते.

Oranges | yandex

आहारात करा बदल

केवळ तीन फळांवर अवलंबून राहू नका. रोजच्या आहारात सर्वप्रकारचे फळे, हिरव्या भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्ये आणि सुकामेवा यांचा समावेश करा.

डिस्क्लेमर: ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Fruit Chaat | pinterest

Mountain Climbers: वजन कमी करण्यासाठी करा फक्त हा एक व्यायाम; संपूर्ण शरीराचा होईल कार्डिओ, मिळतील अनेक फायदे

Mountain Climbers Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा