Coconut Oil: बनावट आणि खरे खोबरेल तेल कसे ओळखावे? घरच्या घरी करून पाहा 'हे' सोपे उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तेलांची भेसळ

नारळाच्या तेलाला वाढती मागणी मिळत असतानाच, काही ठिकाणी त्यात पॅराफिन आणि अन्य बियाण्याच्या तेलांची भेसळ होत असल्याचे दिसते.

त्वचेसाठी धोकादायक

खोटं खोबरेल तेल केस आणि त्वचेसाठी धोकादायक ठरू शकतं. चला, अस्सल खोबरेल तेल ओळखण्याचे सोपे उपाय जाणून घेऊया.

गोठलेलं नारळ तेल

थोडं गोठलेलं नारळ तेल एका चमच्यात घेऊन थंड पाण्यात ठेवा. 30 मिनिटांनी ते मिसळल्यास, तेल बनावट असण्याची शक्यता असते.

भेसळ तेल सैल राहते

नारळ तेलाचा ग्लास फ्रिजमध्ये १ तास ठेवा. शुद्ध तेल घट्ट होते, पण भेसळ असल्यास ते सैल राहते किंवा पूर्ण गोठत नाही.

जळलेला वास

एका पॅनमध्ये एक चमचा खोबरेल तेल गरम करा. जर धूर, बुडबुडे किंवा जळलेला वास आला, तर ते तेल भेसळयुक्त असण्याची शक्यता आहे.

लेबलवरून ओळख

खोबरेल तेलाची खरी ओळख लेबलवरूनही होते. जर त्यावर 'व्हर्जिन', 'कोल्ड प्रेस्ड' किंवा 'अनरिफाइंड' असे लिहिले असेल, तर ते शुद्ध तेल मानले जाते.

NEXT: सफरचंदाच्या बिया खाल तर 'हा' होईल आजार, जाणून घ्या किती गंभीर असतो परिणाम

येथे क्लिक करा