ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बर्फाचे तुकडे, आठवडाभर साठवलेली मलई, इलेक्ट्रिक मिक्सर, पाणी.
सर्व प्रथम, फुल फॅट दुधाची आठवडाभर साठवून एका डब्यामध्ये रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
एक आठवड्यानंतर साठवलेली मलई इलेक्ट्रिक मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यामध्ये बर्फाचे तुकडे आणि थंड पाणी घाला आणि ग्राईंड करा.
लोणी आणि पाणी वेगवेगळी होईपर्यंत मिक्सरमध्ये ग्राईंड करा.
लोणी आणि पाणी वेगवेगळं झाल्यावर तयार लोणीचे गोळे थेडं पाण्यामध्ये थोड्यावेळ ठेवा.
त्यानंतर तयार लोणी एखाद्या डब्यामध्ये काढून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
तयार बटर ब्रेडवर लावून खा. तुमचे होममेड बटर घरच्या घरी तयार आहे.