ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी तो धुवून सुकवावा. यामुळे तो जास्त काळ ताजा राहतो.
प्लॅस्टिकच्या पिशव्यांऐवजी कागदी पिशव्यांचा वापरा करावा यामुळे भाज्यांना हवा मिळते.
आले, लसूण आणि कांदे फ्रिजच्या बाहेर ठेवा, कारण फ्रिजमधील ओलाव्यामुळे ते खराब होऊ शकतात.
पालेभाज्या ताज्या ठेवण्यासाठी त्यांना ओलसर कापडात गुंडाळा.
टोमॅटो, काकडी आणि वांगी यांसारख्या भाज्या घरातील नॉर्मल तापमानात ठेवा.
बटाटे आणि कांदे वेगळे ठेवा. ते एकत्र ठेवल्यास लवकर खराब होतात.
फुलकोबी आणि ब्रोकोलीचे घट्ट पॅकेजिंग करणे टाळा, कारण घट्ट पॅकेजिंगमुळे ते लवकर खराब होतात.
भाज्या नियमितपणे तपासा आणि खराब होत असलेल्या भाज्या वेगळ्या करा.