Saam Tv
दारा आणि खिडक्यांच्या जाळीवरील धूळ काढण्यासाठी घरी तयार करा हे मिश्रण ज्यामुळे खिडक्यांवरील धूळ मिनीटांत निघून जाईल.
गरम पाणी, कपडे धुण्याचा डिटर्जंट पावडर, भांडी धुण्याचे लिक्विड , स्पंज किंवा जुना स्क्रबर, एक बाल्टी किंवा टब
सर्वप्रथम एका बाल्टीत हात सहन करू शकेल इतके कोमट किंवा गरम पाणी घ्या. त्यात कपडे धुण्याची डिटर्जंट पावडर आणि थोडे भांडी धुण्याचे लिक्विड घालून चांगले मिसळून घ्या.
तयार केलेल्या द्रावणात स्पंज किंवा कपडा बुडवून तो संपूर्ण जाळीवर व्यवस्थित लावा, जेणेकरून जाळीचा सर्व भाग पूर्णपणे ओला होईल.
हे द्रावण लावल्यानंतर जाळी १० ते १५ मिनिटांसाठी तशीच राहू द्या. यामुळे जाळीवर साचलेली तेलकट चिकटाई आणि धुळीचा कडक थर मऊ होण्यास मदत होईल.
१० ते १५ मिनिटांनंतर स्पंज किंवा स्क्रबरच्या मदतीने जाळी हलक्या हाताने घासून घ्या. यामुळे तेल आणि धुळीचा थर अजिबात जोर न लावता सहज निघून जाईल.
शेवटी, पाणी मारून जाळी स्वच्छ करा आणि लगेचच कोरड्या कपड्याने ती नीट पुसून घ्या, जेणेकरून लोखंडावर गंज चढणार नाही.
या सोप्या पद्धतीमुळे जाळी घासताना जास्त मेहनत करावी लागत नाही. गरम पाणी आणि डिटर्जंटचे मिश्रण चिकटपणा लगेच दूर करते.
NEXT : वजन कमी करायचे आहे? मग रोज किती पाणी प्यावे? जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी