Manasvi Choudhary
कोरिगड किल्ला हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ल्यापैंकी एक आहे. कोरिगड किल्ल्याला जुना इतिहास वारसा लाभलेला आहे.
पुण्याच्या दिशेने जाताना लोणावळ्याजवळ हा किल्ला वसलेला आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेत कोरिगड किल्ला वसला आहे. किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची येथे गर्दी होते.
किल्ल्यावर चढण्यासाठी चढण साधी सरळ आणि सोपी असल्याने येथे ट्रेकर्स येतात. गडावर पोहचण्यासाठी २८० पायऱ्या आहेत. जे आजही मोठ्या प्रमाणात सुस्थितीत आहेत.
कोरिगड किल्ला ट्रेकर्सचे आकर्षण केंद्र आहे. हिवाळ्यात कोरिगड किल्ल्यावर ट्रेकर्स भेट देतात. पावसाळा तसेच हिवाळ्यात भेट देतात.किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग अत्यंत सोपा असल्याने ट्रेकर्सप्रेमी कोरीगड किल्ल्याला भेट देतात.
हिवाळा व पावसाळ्यात कोरीगड किल्ल्याला तुम्ही भेट देऊ शकता. येथील हिरवळ आणि धबधबे ट्रेकिंगचा अनुभव अविस्मरणीय बनवतात.
तीन हजार फूट उंचीचा कोरिगड किल्ला आहे. या किल्ल्यांवर कोरीईदेवीचे मंदिर आहे कोराईदेवीच्या मंदिरावरून किल्ल्याला कोरीगड असे नाव पडले असल्याचा इतिहास आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.