Manasvi Choudhary
लहान मुलांच्या टिफीनला काय द्यायचं हा प्रश्न प्रत्येक पालकांना असतो.
लहान मुले ही भाज्या खायला मागत नाही.
अशातच तुमचीही मुलं भाज्या खात नसतील तर सोपी रेसिपी नक्की ट्राय करा.
विविध भाज्यापासून घरीच बनवा वेजिटेबल पकोडा रेसिपी.
वेजिटेबल पकोडा रेसिपी बनवण्यासाठी सिमला, पनीर, बटाटा, मिरची, फ्लॉवर, बेसन, सोडा, मीठ, हळद, मसाला, तांदळाचे पीठ हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम भाज्या स्वच्छ धुवून मध्यम आकाराच्या कापून घ्या.
नंतर एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, सोडा, मीठ हळद, मसाला आणि थोडे पाणी हे मिश्रण चांगले एकजीव करा.
या मिश्रणात कापलेले पनीर, बटाटा, मिरची, फ्लॉवर हे मिक्स करून घ्या.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये मिश्रण एक एक करून सोडा.
अशाप्रकारे वेजिटेबल पकोडा सर्व्हसाठी तयार आहे.