Modak Recipe: पारंपारिक पद्धतीनं घरीच बनवा उकडीचे मोदक, सर्वांना आवडतील

Manasvi Choudhary

उकडीचे मोदक

उकडीचे मोदक खायला सर्वांनाच आवडतात. गणरायाचे प्रिय मानले जाणारे मोदक घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Modak Recipe | Social Media

मोदक रेसिपी

अनेकांना उकडीचे मोदक घरी बनवता येत नाही. यासाठी आज आम्ही सोपी रेसिपी तुम्हाला सांगणार आहोत.

Modak Recipe | Social Media

साहित्य

उकडीचे मोदक बनवण्यासाठी तांदळाचे पीठ, किसलेले नारळ, गूळ, साजूक तूप, वेलची पावडर, मीठ हे साहित्य घ्या.

Modak Recipe | Social Media

तूप घ्या

उकडीचे मोदक बनवण्यासाठी गॅसवर सर्वप्रथम एका भांड्यात तूप घाला. तूपामध्ये किसलेले खोबरे मिक्स करून परतून घ्या.

Modak Recipe | Social Media

गूळ मिक्स करा

यानंतर या मिश्रणात गूळ घालून मिश्रण एकजीव करा. गॅसवर मध्यम आचेवर हे मिश्रण चांगले एकजीव करा.

Modak Recipe | Social Media

वेलची पावडर

मिश्रण घट्ट झाले की त्यात वेलची पावडर घाला अशाप्रकारे मोदकाचे सारण तयार होईल.

Modak Recipe | Social Media

मोदकाचे पीठ

आता दुसऱ्या बाजूला गॅसवर एका भांड्यात तूप घला त्यात थोडे मीठ घाला आणि मिक्स करा. नंतर यात पाणी घाला.

Ukdiche Modak | Social Media

तांदूळ पीठ

पाण्याला उकळी आली की त्यात तांदळाचे पीठ थोडं घालून मिक्स करा. नंतर पीठ थंड करा आणि मळून घ्या.

Modak Recipe | Social Media

मोदक सारण मिक्स करा

पीठाचे गोळे करा ते चपटे करा आणि त्यात सारण घाला. नंतर पीठाचे प्लीट्स गोळा करून बिंदूचा आकार द्या. अशाप्रकारे उकडीचे गरमागरम मोदक तयार होतील.

Modak Recipe | Social Media

next: Priya Marathe: प्रिया मराठेचे 'तू तिथे मी' मालिकेतील फोटो पाहिलेत का?

येथे क्लिक करा...