ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दिवाळीला घरोघरी फराळ बनवला जातो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खास नैवेद्य दाखवला जातो.
तुम्हालाही घरी कुरकुरीत मक्याचा चिवडा बनवायचा असेल तर रेसिपी अत्यंत सोपी आहे.
मक्याचा चिवडा बनवण्यासाठी गॅसवर कढईत गरम तेलामध्ये शेंगदाणे तळून घ्या. नंतर यात बारीक चिरलेली मिरची,कढीपत्ता आणि खोबरा मिक्स करा.
चिवडा मसाला तयार करण्यासाठी त्यात कश्मिरी मिरची, चाट मसाला, धना पावडर, आमचूर पावडर आणि हळद एकत्र करा.
नंतर तेलामध्ये मक्याचे प्लेक्स तळून घ्या यानंतर त्यात मसाला मिक्स करून संपूर्ण मिश्रण एकजीव करा.
तळलेले खोबऱ्याचे काप, शेंगदाण यामध्ये तुम्ही मिक्स करा आणि शेव किंवा फरसाण देखील मिक्स कराा. अशाप्रकारे मक्याचा कुरकुरीत चिवडा सर्व्हसाठी तयार आहे.