Ruchika Jadhav
प्रत्येक तरुण आणि तरुणीला जीन्स हे आउटफीट अगदी कंफर्टेबल वाटतं.
मात्र काहीवेळा आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन देखील काही कपडे खरेदी केल्यास ते आपल्याला लूज होतात.
जिन्स लूज झाली तर अनेक व्यक्ती टेलरकडून ती बारीक करून घेतात.
मात्र तुमच्याकडे यासाठी फार वेळ नसेल तर तुम्ही कमरेला पट्टा लावून फिटींग ऍडजेस्ट करू शकता.
प्रत्येकाकडे आपल्या मापाचा पट्टा असतो त्यामुळे पट्ट्याने छान फिटींग बसते.
जिन्स टाइट करण्यासाठी आणखी एक पर्याय म्हणजे तुम्ही गरम पाण्यात जिन्स धुवून घेऊ शकता.
जिन्स फिटींगमध्ये बसावी यासाठी आणखी एक उपाय म्हणजे तुम्ही बेल्टसाठी असलेल्या कप्प्यातून एक रुमाल अडकवून फिटिंग ऍडजोस्ट करू शकता.