Easy Sweet Dish Recipes: १५ मिनिटांत बनवा 'हे' गोड पदार्थ; मार्केटमध्ये न जाता घरच्या घरीच करा तयार

Shruti Vilas Kadam

शिरा (सूजी हलवा)

रवा, तूप, साखर आणि ड्रायफ्रूट्स वापरून तयार होणारा शिरा हा झटपट बनणारा पारंपरिक गोड पदार्थ आहे. चहा किंवा नाश्त्यासोबतही तो छान लागतो.

Sweet Potato Sheera

ब्रेड शाही टुकडा

घरातील ब्रेड, दूध, साखर आणि ड्रायफ्रूट्स वापरून काही मिनिटांत स्वादिष्ट शाही टुकडा तयार करता येतो. पाहुण्यांसाठीही हा उत्तम पर्याय आहे.

Shahi Tukra Recipe | Saam Tv

बनाना हनी डिलाईट

केळीचे काप करून त्यावर मध, ड्रायफ्रूट्स आणि थोडी दालचिनी पावडर घाला. हेल्दी आणि चविष्ट डेझर्ट काही मिनिटांत तयार होतो.

banana tost | canva

चॉकलेट मग केक

मैदा, कोको पावडर, दूध, साखर आणि बेकिंग पावडर एकत्र करून मायक्रोवेव्हमध्ये अवघ्या २-३ मिनिटांत चॉकलेट मग केक तयार करता येतो.

Chocolate Cake

नारळाचे झटपट लाडू

खोबऱ्याचा किस, कंडेन्स्ड मिल्क किंवा दूध आणि साखर वापरून झटपट नारळाचे लाडू तयार करता येतात. हे मुलांनाही खूप आवडतात.

Coconut Ladoo | Saam Tv

फ्रूट योगर्ट बाउल

दही, हंगामी फळे, मध आणि ड्रायफ्रूट्स एकत्र करून हेल्दी आणि स्वादिष्ट डेझर्ट तयार करा. हा पदार्थ पौष्टिक आणि पोटभरीचाही असतो.

Yogurt | yandex

खजूर-ड्रायफ्रूट बाइट्स

बिया काढलेले खजूर, बदाम, अक्रोड आणि पिस्ते मिक्सरमध्ये फिरवून छोटे बाइट्स तयार करा. साखरेशिवाय तयार होणारा हा हेल्दी गोड पदार्थ आहे.

dry fruit cake | yandex

Silver Chain Design: दिसायला क्लासी आणि किंमतही बजेटमध्ये, चांदीच्या चैनच्या 'या' 7 आकर्षक डिझाईन्स एकदा नक्की पाहा

Silver Chain Design | Saam Tv
येथे क्लिक करा