Manasvi Choudhary
वडापाव हा महाराष्ट्रात फेमस पदार्थ आहे. प्रत्येकजण आवडीने वडापाव खातो. वडापाव तुम्ही घरी देखील सोप्या पद्धतीने बनवू शकता.
घरी वडापाव बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे फक्त तुम्ही काही सोप्या टिप्स लक्षात घेणे महत्वाचे आहे.
वड्याच्या आतली बटाट्याची भाजी चवदार बनवण्यासाठी मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट आणि चिमूटभर हिंग घालून फोडणी द्या.
बेसनाचे पीठ भिजवताना ते फार घट्ट किंवा फार पातळ नसावे. पिठामध्ये चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद मिक्स करा.
बटाट्याच्या भाजीचे गोल गोळे करून ते बेसनाच्या पिठात चांगले बुडवून गरम तेलात सोडा म्हणजे वडे कुरकुरीत फ्राय होतील.
बेसनाच्या भिजवलेल्या पिठामध्ये वरून १ चमचा कडकडीत गरम तेल किंवा चिमूटभर खाण्याचा सोडा टाका. यामुळे वडे कुरकुरीत होती
वडे तळताना तेल चांगले कडक तापलेले असावे. तेल गार असेल तर वडे कुरकरीत फ्राय होणार नाही. तेल गरम नसेल वडे चिकटतील.