ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या सर्वांनाच स्ट्रीटफूड प्रचंड आवडतं.
स्ट्रीटफूडची तोंडाला पाणी आणणारी चटकदार चव त्यात वापरल्या जाणाऱ्या सॉसमुळे येते.
त्यातीलच एक म्हणजे तंदुरी सॉस जो बर्गर, पिझ्झा, रोल्स अशा अनेक स्ट्रीटफूडची चव वाढवतो.
पण आता तुम्ही सोप्या पद्धतीने घरीच तंदुरी सॉस बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया झटपट रेसिपी.
मेओनीज, दही, तंदुरी मसाला, कश्मिरी लाल तिखट, मीठ, तेल आणि कोळशाचा तुकडा
एका सॉस पॅनमध्ये समान मापात मेओनिज व दही घ्या.
त्यात चवीनुसार सर्व मसाले, मीठ आणि थोडे तेल घालून सॉससाठीचे मिश्रण तयार करा.
तयार मिश्रण मंद आचेवर २ मिनिटे शिजवून घ्या.
नंतर गरम कोळशाचा तुकडा तयार सॉसमध्ये ठेवून त्यावर थोडे तेल सोडा. काहीवेळ झाकून ठेवा. चटकदार घरगुती तंदुरी सॉस तयार आहे.