Manasvi Choudhary
लग्नापूर्वी मेहंदी कार्यक्रम सोहळा साजरा केला जातो. मेहंदी कार्यक्रमात नवरीच्या हातावर आणि पायावर मेहंदी काढतात.
लग्नाआधी मेहंदी काढणे ही जुनी महत्वाची परंपरा आहे. आजही मेहंदी काढण्याची ही परंपरा सर्वत्र सुरू आहे.
हिंदू धर्मात नवरीचा 'सोळा शृंगार' महत्त्वाचा मानला जातो. या सोळा शृंगारांपैकी मेहंदी एक आहे. ज्याप्रमाणे हातावरची मेहंदी सौभाग्य दर्शवते, त्याचप्रमाणे पायावरची मेहंदी नवरीचे पाऊल घरात पडताना ते शुभ आणि समृद्धी घेऊन येईल, असे मानले जाते.
पायांवर मेहंदी काढल्याने पायाला थंडावा मिळतो. लग्नात सुरू असलेली धावपळ यामुळे थकवा येत नाही.
मेहंदीमध्ये अँटी-सेप्टिक आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. पूर्वी लोक अनवाणी चालायचे, त्यामुळे पायांना भेगा पडणे किंवा इन्फेक्शन होण्याचा धोका असायचा. मेहंदी लावल्याने पायांच्या त्वचेचे रक्षण होते
पायात पैंजण आणि जोडवी घातल्यावर मेहंदी लावलेले पाय अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.