Siddhi Hande
जेवणासोबत नेहमीच तोंडी लावायला काहीतरी हवं असतं. तुम्ही जेवताना तांदळाचे कुरकुरीत पापड खाऊ शकतात.
तांदळाचे पीठ,पाणी,मीठ, जिरं, तिखट, पापडाचा खार
सर्वात आधी तांदूळ रातभर भिजत ठेवा. सकाळी तांदळातील पाणी काढून ते मिक्सरमध्ये बारीक करा.
त्यात मीठ आणि मसाले टाकून पीठ मळून घ्या. त्यात पापडाचा खार, जिरं टाका.
सर्वात आधी एका लहान ताटाला तेल लावून घ्या. यानंतर हे मिश्रण पातळसर पसरवून घ्यायचे आहे.
यानंतर गॅसवर पातेल्यावर पाणी तापत ठेवा. त्यावर चाळणीमध्ये या तांदळाच्या पापड्या ठेवायच्या आहे.
यानंतर पापड्या शिजल्या की ताट खाली घ्यायचे आहे. त्यानंतर हळूवार किंवा धाग्याच्या साहाय्याने पापड्या वेगळ्या करायच्या आहेत.
यानंतर या पापड्या उन्हात वाळवून घ्या.
हे पापड छान वाळल्यानंतर ते तुम्ही कडकडीत तेलात तळून खाऊ शकतात.