ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पहिल्यांदा खजुरमधून त्याच्या बिया काढून घ्या.
एका कढईत तेल टाकून त्यात हिंग, लाल मिरची तसेच जिरे, तमालपत्र आणि मोहरी गरम तेलात परतून घेऊन त्यात लसून मिस्क करा.
सर्व परतून झाल्यास त्यात हळद, मिरची पावडर आणि धणे मिस्क करा.
त्यानंतर खजूर, मीठ तसेच कैरीची पावडर टाकून आणि सर्व साहित्य नीट एकजीव करा
सर्वकाही मिस्क केल्यानंतर त्यावर झाकण ठेवून थोडा वेळ मंद आचेवर शिजू द्या
मंद आचेवर शिजून झाल्यावर झाकण उघडा आणि त्यात व्हिनेगर तसेच गूळ टाकून घ्या.
सर्व मिश्रण झाकून नीट शिजवा आणि मग शेवटी गॅस बंद करा.
अशाप्रकारे घरच्या घरी तयार होईल खजुराचे लोणचे .