Sakshi Sunil Jadhav
घरात कधीतरी नॉर्थ इंडियन पदार्थ बनवले की सगळेच आवडीने खातात. पुढे आपण मटर मशरूमची चमचमीत रेसिपी जाणून घेणार आहोत.
तुम्ही मटर मशरूमची भाजी चपाती, भाकरी किंवा पराठ्यासोबत खाऊ शकता.
मटर आणि मशरूम शरीरासाठी उत्तम मानलं जातं. त्याने तुमच्या शरीराला आवश्यक असणारे पौष्टीक घटक मिळतात.
मटर मशरूनची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी ताजे मटार आणि मशरूम घ्या. तुम्ही फ्रोजन मटरचा सुद्धा वापर करू शकता. या भाज्या धुवून घ्या.
आता एका कढईत तेल टाकून कांदे सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतून घ्या. मग त्यामध्ये आलं-लसणाची पेस्ट घाला.
कांदा सोनेरी झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो मिक्स करा आणि त्यालाही व्यवस्थित परतून घ्या.
आता त्यामध्ये मीठ, लाल तिखट, हळद आणि धणे पावडर घालून तेलात परतून घ्या.
शेवटी मटर आणि मशरूम मिक्स करून त्यामध्ये पाणी मिक्स करून झाकून ठेवा. मटर शिजल्यावर तयार होईल तुमची भाजी.