Joint Pain : एक कप चहाने सांधेदुखीपासून मिळेल आराम

Sakshi Sunil Jadhav

सध्याचे वातावरण

पावसाळ्यात वातावरणातला हा बदल आद्रता आणि कमी शारीरिक हालचालींमुळे अनेकांना सांधेदुखी आणि गुडघेदुखीचा त्रास वाढतो. अशा वेळी सतत औषधं घेण्याऐवजी हळदीचा चहा नैसर्गिक पर्याय ठरू शकतो.

Joint Pain Relief | google

पावसाळ्यात सांधेदुखी का वाढते?

पावसाळ्यातलं वातावरण आणि कमी हालचालींमुळे सांध्यांमध्ये ताठरपणा वाढू शकतो. त्यामुळे गुडघेदुखी आणि सांधेदुखीचा त्रास जास्त जाणवतो.

Turmeric Tea Benefits

हळदीतले घटक

हळदीत कर्क्युमिन हा नैसर्गिक घटक असतो. त्याने सांध्यांमधील सूज कमी होते आणि वेदनाही कमी होतात.

Turmeric Tea Benefits

संशोधनात काय आढळलं?

'BMC Complementary Medicine and Therapies' मध्ये दिलेल्या माहितीनुसार, ऑस्टिओआर्थरायटिस असलेल्या रुग्णांमध्ये हळद दुखणं कमी करण्यासाठी उपयोगी ठरते.

Knee Pain Remedy

चालण्याची क्षमता

काही संशोधनानुसार रोज हळदीचं सेवन केल्यावर फक्त वेदना कमी होत नाहीत, तर चालणे-फिरणेही जास्त सोपं होतं.

Curcumin for Arthritis

चहा कसा बनवायचा?

एक कप पाण्यात अर्धा ते एक चमचा हळद घालून ५ ते ७ मिनिटं उकळून घ्या. इच्छेनुसार आलं, दालचिनी, काळी मिरी आणि शेवटी मध घालू शकता.

Curcumin for Arthritis

काळी मिरीचे महत्त्व

काळ्या मिरीतले पायपेरिन हळदीतले कर्क्युमिन शरीरात जास्त प्रभावीपणे शोषलं जाण्यास मदत करतं.

Natural Anti Inflammatory

पेनकिलरचा पर्याय

हळदीचा चहा काही लोकांना वेदना कमी करायला मदत करू शकतो. पण डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

Natural Anti Inflammatory

तज्ज्ञांचा सल्ला

संतुलित आहार, नियमित हलका व्यायाम, पुरेसे पाणी आणि हळदीचा मर्यादित वापर यामुळे सांध्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होऊ शकते.

Natural Anti Inflammatory

NEXT : हाय बीपीचा त्रास आहे? मग 'या' 7 पदार्थांपासून राहा दूर,ह्रदय राहील निरोगी

high blood pressure
येथे क्लिक करा