ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मोदकांसह ही चविष्ट मिठाई गणेशोत्सवचा आनंद अधिक वाढवेल.
जाणून घेऊया या चविष्ट मलाई बर्फीची झटपट रेसिपी
दूध, खोबऱ्याचा कीस, पीठीसाखर, दूध पावडर, वेलची पूड, ड्रायफ्रूट्स
एका कढईत दूध उकळवून घ्या. नंतर त्यात गरजेनूसार खोबऱ्याचा कीस घाला.
दूध आणि खोबऱ्याचे मिश्रण मंद आचेवर शिजवा.
मिश्रण शिजत असताना त्यात चवीनुसार पीठीसाखर घाला.
मिश्रण घट्ट होण्यासाठी त्यात थोडी दूध पावडर घाला.
मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यात वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स घाला.
तयार मिश्रण ताटात काढून घ्या. थंड झाल्यावर बर्फिसारखे चौकोनी काप करून घ्या. सर्व्ह करा.