ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पनीर हे सर्वांनाच खूप आवडते. पनीरपासून अनेक स्नॅक्स आणि डिश बनवता येतात. तर काही लोकांना पनीर कच्चेसुध्दा खायला आवडते.
पनीर खाल्याने प्रोटीन मिळते. पनीरमध्ये अनेक तत्व आहेत जी शरीरासाठी चांगले मानले जातात. तसेच कच्चे पनीर खाल्यास वजन वाढण्यास मदत होते.
अनेक लोक बाजारातून पनीर आणतात. बाजारातील पनीर सुध्दा चांगलेच असते पण खुपदा त्यात भेसळ मिक्स केली जाते. तर जाणून घ्या घरच्या घरी पनीर कसे बनवावे.
दूध, लिंबू, सूती कापड आणि गाळणी इत्यादी साहित्य लागते.
एका मोठ्या भांड्यात दूध गरम करण्यासाठी ठेवून द्या. दूधात आर्धे लिंबू पिळा.
आता एका भांड्यात सूती कापड घेवून फाटलेले दूध गाळून घ्या.
गाळून घेतलेल्या फाटलेल्या दूधाला थंड पाण्याने धुवून घ्या. धुतल्यानंतर संपूर्ण पाणी काढून टाका.
पाणी काढल्यानंतर पनीर सूती कापडामध्येच गुंडाळून ठेवा. त्यावर जड वस्तू ठेवून १ तासासाठी तसेच ठेवून द्या.
आता तुमचे पनीर तयार आहे. यानंतर एका वेगळ्या प्लेटमध्ये ठेवा आणि फ्रिजमध्ये स्टोर करा.
घरी बनवलेले पनीर तयार आहे. पनीर तुम्ही कच्चेसुध्दा खाऊ शकता आणि पनीर पासून चांगल्या डिशसुध्दा बनवू शकता.