ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घरगुती फेशियल नियमित केल्याने त्वचा चांगली आणि चमकदार राहते. घरी फेशियल केल्यास ते जास्त खर्चिक पडत नाही उलट त्वचेसाठी सुरक्षित, स्वस्त आणि प्रभावी मानले जाते
अॅलोवेरा जेलने चेहरा स्वच्छ करून त्याच जेलने चेहऱ्यावर मसाज करा. अॅलोवेरा जेल लावल्यास पिंपल्स कमी होतात आणि त्वचा थंड व फ्रेश राहते.
बेसन, दूध आणि चिमूटभर हळद हे एकत्र करुन याचा पॅक चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होते आणि त्वचा उजळण्यास मदत होते.
केळी किंवा पपई मॅश करा त्यात मध टाका आणि मिक्स करुन चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा मऊ होते.
कच्चे दूध चेहऱ्याच्या क्लीन्सिंगसाठी वापरा आणि चेहऱ्याची मधाने मसाज करा. तुमची कोरडी त्वचा मऊ होईल आणि चमकेलसुध्दा.
कॉफी पावडर आणि दही मिक्स करुन त्याचा स्क्रब किंवा पॅक तयार करा. हा पॅक चेहऱ्यावर लावून धुतल्यानंतर डेड स्किन निघते आणि थकलेली त्वचा फ्रेश दिसू लागते
कोणतेही फेशियल करण्याआधी 5 ते 7 मिनिटे वाफ घ्या किंवा हाफ फेशियल झाल्यावर 10 मिनिटे वाफ घ्या. वाफ घेतल्याने पोअर्स उघडतात आणि चेहऱ्यावर फेशियलचा परिणाम अधिक वाढतो.
फेशियल करुन झाल्यावर चेहऱ्यावर गुलाबपाणी टोनर म्हणून लावा आणि अॅलोवेरा तेलाने हलका मसाज करा. असे केल्यास त्वचा टाईट आणि रिलॅक्स होण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.