ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाल्याने तब्येत बिघडते. त्यामुळे पोटदुखी, खोकला इ.आजार बळावतात. त्यावर हे घरगुती उपाय करा आणि पावसाळ्यात निरोगी राहा.
खोकला व सर्दी यापासून बचावासाठी आयुर्वेदिक काढ्यांचे सेवन करा, कारण यात दाहक-विरोधी (anti-inflammatory) गुणधर्म असतात.
पावसाळ्यात नेहमी कोमट किंवा उकळलेले पाणी प्यावे. यामुळे पोटाचे आजार व संसर्ग टाळता येतात.
कुंड्यांमध्ये पाणी साचू देऊ नका. झोपताना मच्छरदानीचा वापर करा.
पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते, त्यामुळे पचायला हलके आणि वाफाळलेले अन्न खावे.
हळदीमध्ये रोगप्रतिकारकशक्ती जास्त असते. कोमट दुधात हळद आणि सुंठ टाकून प्यायल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
पावसाळ्यात पालेभाज्यांवर किडे आणि जंतू असू शकतात. पालेभाजी शिजवण्यापूर्वी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्या.
बाहेरून आल्यावर हात-पाय स्वच्छ धुवा. ओलसरपणामुळे होणाऱ्या त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी आपले शरीर कोरडे ठेवा.
येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.
Fatty Liver : शरीरात ही लक्षण दिसली तर समजा लिव्हरवर जमा होतेय चरबी, परिस्थिती ठरू शकते जीवघेणी