ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सर्व हिरव्या भाज्यंपैकी पालक ही भाजी खुपच पौष्टिक मानली जाते.
या काही सोप्या टिप्स तुम्हाला घरच्या घरी हिरवीगार पालक उगवायला मदत करतील.
पालक हे थंड हंगामातले पीक आहे. म्हणूनच पेरणी करताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
एक आयताकृती कुंडी घ्या. त्यात पालकचे बियाणे रांगेत १-२ इंच खोलवर पेरा.
यासठी वापरली जाणारी माती नायट्रोजनयुक्त आणि चांगला निचरा होणारी असेल याची काळजी घ्या.
माती मोकळी करून त्यात कंपोस्ट खत घाला. कुंडी भरपूर सुर्यप्रकाश येईल अशा जागी ठेवा. नियमितपणे पाणी द्या.
रोपे दिसू लागल्यावर ती पुन्हा ४-६ इंच अंतरावर लावा. रोपांना दररोज ४ ते १० तास सूर्यप्रकाश मिळू द्या.
पुन्हा लागवडीनंतर ४ आठवड्यांनी नायट्रोजनयुक्त सेंद्रिय खत द्या. काही दिवसांनी लहान पाने बेबी पालक म्हणून वापरू शकता.
४ ते ६ आठवड्यांत पूर्ण वाढ झालेल्या रोपाच्या बाहेरील पाने उपटून टाका. एका वेळी १ किंवा चार रोपटेच तोडा.