Manasvi Choudhary
गावरान पद्धतीचा हिरव्या मिरचीचा ठेचा बनवण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी सहज हिरवी मिरची ठेचा बनवू शकता.
ठेचा बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर तवा ठेवा, तवा तापल्यानंतर त्यात शेंगदाणे भाजून घ्या.
नंतर यात हिरवी मिरची घाला. हिरवी मिरची थंड करा आणि तिची बारीक जाडसर पेस्ट करा.
बारीक केलेल्या मिरच्यांमध्ये लसूण आणि कोथिंबीर मिक्स करा. त्यात शेंगदाणे, मीठ घालून संपूर्ण मिश्रण एकदा बारीक करून घ्या.
अशाप्रकारे तुमचा हिरव्या मिरची झणझणीत ठेचा तयार होईल.
हिरव्या मिरचीचा ठेचा तुम्ही भाकरी आणि चपातीसोबत सर्व्ह करू शकता.