ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
डोळ्यांना सुंदर लुक देण्याकरिता पापण्यांचा रोल खूप महत्त्वाचा असतो. पापण्यांना मस्कारा लावल्यानंतर पापण्या अधिक सुंदर दिसू लागतात.
आजकाल लोक पापण्यांना हेवी लुक देण्याकरिता पापण्यांना कर्ल केले जाते. याकरिता अनेक प्रकारचे कर्लरसुध्दा येतात.
तर जाणून घ्या पापण्यांना अधिक सुंदर आणि कर्ल करण्याच्या सोप्या ट्रिक्स
कर्लरच्या साहाय्याने पापण्यांना कर्ल करु शकता. पापण्यांना दाबा आणि वरच्या बाजूस उचला.
पापण्यांना वर उचलण्यासाठी व्हॅसलीन वापरावे यामुळे पापण्या कर्ल होण्यास मदत होते.
ब्लो ड्रायरने सुध्दा पापण्या कर्ल केल्या जातात. ड्रायर गरम करा, लहान कंगव्याने पापण्या धरा आणि नंतर ब्लो ड्राय करा.
पापण्यांना कर्ल केल्यानंतरच मस्कारा लावा. मस्कारा कर्ल करण्याच्या आधी लावल्याने पापण्या तुटू शकतात.
पापण्यांचा कर्ल जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी, फक्त वॉटरप्रूफ मस्करा वापरावा.