ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल, लग्नापूर्वी लोकांना मित्रांसोबत बॅचलर पार्टी करायला आवडते. या पार्टीत जवळच्या मित्र-मैत्रिणींना बोलवून पार्टी केली जाते.
लोक आता ट्रिपचे नियोजन करताना बॅचलरेट पार्टीचे देखील नियोजन करतात. खासकरुन हिल स्टेशनवर पार्टी करण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे.
जर तुम्ही लग्नाआधी बॅचलर पार्टी करण्याचा विचार करत असाल तर, तुमच्या लीस्टमध्ये या बेस्ट ठिकाणांचा समावेश करा.
दिल्लीपासून काही तासांच्या अंतरावर असलेले चंदीगड हे नाईटलाइफसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुमच्या बॅचलर पार्टीचे आयोजन छान होऊ शकते.
शिवपुरी हे ठिकाण ऋषिकेश जवळ आहे. शिवपुरीमध्ये तुम्ही बॅचलर पार्टीचा आनंद घेऊ शकता. येथे ऑक्टोबर ते जानेवारी या दरम्यान फिरायला जावू शकता.
नाईटलाइफसाठी प्रसिद्ध असलेले जयपूर बॅचलरेट पार्टीसाठी एक सुंदर ठिकाण आहे. जयपूर दिल्लीपासून फार लांब नाही त्यामुळे सहज जाता येते.
बॅचलरेट पार्टीसाठी तुम्ही नैनितालमध्ये वुडन रिसॉर्ट बुक करू शकता. हे एक बजेट-फ्रेंडली ठिकाण आहे.
जर तुम्हाला लांबचा प्रवास करायचा नसेल तर गुरुग्राममध्ये तुमची बॅचलरेट पार्टी करु शकता. येथे अनेक चांगले रिसॉर्ट्स आहेत. तुम्ही येथील अरावली पर्वतरांगांना देखील भेट देऊ शकता.
जर बजेट जास्त असेस तर तुम्ही गोव्या सारख्या ठिकाणी पार्टीसाठी जाऊ शकता. गोव्यात असंख्य समुद्रकिनारे आहेत आणि बॅचलरेट पार्टीकरिता छान व्हिला देखील आहेत.
लोणावळा हे ठिकाण अत्यंत सुंदर आणि थंडगार आहे. हे ठिकाण बॅचलरेट पार्टीकरिता निवडू शकता.