Honeymoon Destination : डिसेंबरमध्ये हनीमून प्लॅन करत आहात तर, भारतातील या ठिकाणी नक्कीच जा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हनीमून डेस्टिनेशन

लग्नानंतर कपल्स चांगल्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करीत असतात. याकरिता आधीपासूनच ठिकाण निश्चित करणे गरजेचे असते.

Honeymoon | GOOGLE

डिसेंबरमधील प्लॅन

जर तुम्ही तुमच्या लग्नानंतर डिसेंबरमध्ये हनिमूनचा प्लॅन करत असाल, तर भारतातील या थंडगार ठिकाणांवर नक्कीच जा.

Honeymoon | GOOGLE

गुलमर्ग

काश्मिरमधील गुलमर्ग हे डिसेंबरमध्ये हनिमूनसाठी बेस्ट ठिकाणांपैकी एक आहे. येथे धबधबे देखील बघायला मिळतात. गुलमर्ग हे जम्मू-काश्मीरमध्ये आहे आणि उंचीवर वसलेले बर्फाच्या आलंकाराने भरलेले पर्यटनस्थळ आहे. डिसेंबरमध्ये येथे बर्फ आणि थंडीचा अनुभव घेता येऊ शकतो.

Honeymoon | GOOGLE

शिमला

बहुतेक लोक त्यांच्या हनिमूनसाठी शिमलाला जाण्याचा प्लॅन करतात. शिमला हे हिमाचल प्रदेशातील एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. हे एक बजेट हनिमून डेस्टिनेशन असून येथे आधिच बुकिंग करणे गरजेचे असते.

Honeymoon | GOOGLE

मनाली

हिमाचल प्रदेशातील मनाली हे सुंदर शहर हनिमूनसाठी एक उत्तम ठिकाण आहे. मनाली हिमाचल प्रदेशातील पहाडी ठिकाण आहे. मनाली सारख्या सुंदर ठिकाणी थंड वातावरणाचा मनोसोक्त आनंद घेता येतो.

Honeymoon | GOOGLE

औली

उत्तराखंडमध्ये असलेले औली हे डिसेंबरमध्ये हनिमूनसाठी एक सुंदर ठिकाण आहे. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात वसलेलं एक सुंदर हिमाच्छादित हिल स्टेशन आहे.

Honeymoon | GOOGLE

मुन्नर (केरला)

केरळ राज्यात वसलेला थंड हवामानाचा हिल स्टेशन आहे. समुद्रसपाटीपासून हिवाळ्यात खूप थंडी नसली तरी शांत आणि रोमँटिक वातावरण देते.जर तुम्हाला दऱ्या, धबधबे आणि नद्या आवडत असतील तर हे तुमच्यासाठी बेस्ट ठिकाण आहे.

Honeymoon | GOOGLE

Winter Health : हिवाळ्यात केळं खाण्याचे फायदे, जाणून घ्या

Banana | GOOGLE
येथे क्लिक करा