ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात हिरवे मटार बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. लोक मटार पासून अनेक पदार्थ बनवून खातात. मटार जवळपास सगळ्यानाच आवडते.
तुम्ही मटार नेहमीच खात आले आहात पण, कधी मटारचे लोणचे खाल्ले आहे का? हिरवेगार मटाराचे लोणचे एकदम टेस्टी लागते.
मटाराचे लोणचे तुम्ही मिनटांत बनवून तयार करु शकता. जाणून घ्या लोणचे बनवण्याची सोपी पध्दत.
मटार दाणे, बडीसोप, ओवा, हळद, लाल मिरची, आमचूर पावडर, आचार मसाला, तेल आणि चवीनुसार मीठ इत्यादी साहित्य लागते.
मटारचे दाणे सोलून घ्या आणि दाण्यांना चांगले धुवून घ्या. धुतल्यानंतर दाण्यातील पाणी निथळे पर्यंत बाजूला ठेवून द्या.
कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. मग त्यात बडीशोप आणि ओवा टाकून भाजून घ्या.
आता त्यात मटार टाका. वरुन हळद, आचार मसाला, लाल मिरची आणि आमचूर पावडर टाकून मिक्स करुन घ्या.
मटारमध्ये सगळे मिक्स केल्यानंतर चवीनुसार मीठ टाका. यानंतर मटारला शिजण्यासाठी झाकणानी कव्हर करुन घ्या.
मटार नरम होईपर्यंत ५ मिनिटे शिजवून घ्या. मटार जळू नये म्हणून सतत चमचाने ढवळत राहा.
मटार मऊ झाल्यावर गॅस बंद करा. तुमचे मसालेदार मटारचे लोणचे तयार आहे.