ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बटाटा, मैदा, पोहे, हिरव्या मिरच्या, जिरे पावडर, पुदिन्याची पाने, मीठ, तेल
सर्वप्रथम बटाटे उकडून घ्या त्यानंतर बटाट्याची साल काढून बटाटे थंड होण्यास ठेवा.
बटाटे थंड झाल्यानंतर चांगला मॅश करून त्यामध्ये चिरलेल्या हिरव्या मिरच्या, जिऱ्याची पावडर, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस मिक्स करा.
सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेल्या मिश्रणाचे गोळे करून घ्या.
वाटीमध्ये मैदा घेऊन त्यात थोडेसे पाणी टाकून पेस्ट तयार करून घ्या.
त्यानंतर मिक्सरमधून पोहे बारीक करून घ्या. टाट्याचे कुरकुरे मैदा आणि पोह्यांच्या मिश्रणात कोट करून तेलात तळा.
दोन्ही बाजूने सोनेरी रंग आल्यनंतर बटाट्याचे कुरकुरे काढून घ्या. तुमचे चटपटीत आलू कुरकुरे सॉस सोबत सर्व्ह करा.