Manasvi Choudhary
पॅरालिसिसचा झटका येण्यापूर्वी शरीरात कोणती लक्षणे दिसतात? जाणून घ्या
पॅरालिसिस हा मेंदूसंबधीत एक गंभीर आजार आहे या आजाराची लक्षणे कोणती आहेत ते जाणून घ्या.
पॅरालिसिस मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित न झाल्यामुळे होतो ज्यामुळे शरीराच्या हाता-पायातील ताकद कमी होते. पॅरालिसिस झटका आल्यानंतर शरीर लुळे पडते त्याचा शरीरावर गंभीररित्या होतो.
पॅरालिसिसचा झटका येण्यापूर्वी अन्न गिळण्यास व श्वास घेण्यास त्रास व्हायला सुरूवात होते.
शरीराच्या हाता- पायांना सतत मुग्यां येत असतील तर तुम्ही वेळीच सावध होऊन वैद्यकीय सल्ला घेणे महत्वाचे आहे.
तीव्र स्वरूपाची डोकेदुखी हे देखील पॅरालिसिस होण्याचे लक्षण आहे. यामध्ये तुम्हाला चक्कर देखील येते.
पॅरालिसिसचा झटका येण्यापूर्वी शरीर एका बाजूला सुन्न पडते, चेहरा , हात आणि पाय यावर परिणाम होतो.
एका किंवा दोन्ही डोळ्यांनी पाहण्यास अडचण येते, अचानक तोल जातो यासारख्या समस्या निर्माण होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.